प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी घेतली गजा मारणेची भेट, नेमकं काय कारण?

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाली होती. कोखरूड परिसरामध्ये त्याच्यावर गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं.  शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजा मारणे यांच्या भेटीचं कारण कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

गजानन मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गजा मारणे त्याची पत्नी आणि पार्थ पवार यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकी कोणत्या  कारणामुळे भेट घेतली याबाबतत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूीवर भेट घेतली असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या भेटीवेळी  शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.

गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून मारणे टोळीच गजा मारणे मुख्य म्होरक्या आहे. गजानन मारणेचं मुळ गाव  मुळशी तालुक्यात आहे. पुण्यात निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यातील टोळीयुद्ध पुण्याला माहिती आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्येस गजा मारणेला अटक झाली होती. तीन वर्ष तो येरवड्यामध्ये होता.  मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा असून दोन्ही टोळ्यांचे म्होरके शरद मोहोळ आणि गजानन मारणे यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता शरद मोहोळ याची हत्या झाली आहे.

शरद मोहोळच्या खूनाचा मास्टरमाईंड

शरद मोहोळ याच्या खूनाचा मास्टरमाईंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांना हाताशी धरत फुलप्रुफ प्लॅन करत शरद मोहोळला संपवलं. विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह आणखी दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणेश मारणे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button