प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..

हिंदुंमध्ये भेदभावाचे विष कालवणे घातक! उध्दव ठाकरे यांची नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

नाशिक : लोकसभेच्या ४८ जागा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता महाराष्ट्र आठवत आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यात फेऱ्या वाढल्या आहेत. मणिपूरमध्ये केवळ दोन जागा असल्याने ते तिकडे गेले नाहीत. महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारखी संकटे आली. तेव्हा ते आले नव्हते. महाराष्ट्राने आर्थिक मदत मागूनही दिली नव्हती. मोदींकडून देश आणि गुजरात यामध्ये भिंत उभी केली जात आहे. देशातील हिंदुंमध्ये भेदभावाचे विष कालवले जात असून ते अतिशय घातक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाशिबीर झाल्यानंतर सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभास्थळी अंबाबाईच्या गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ठाकरे यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत येथील इंग्रजांची वखार लुटली होती. पण मोदी आणि शहा महाराष्ट्राला लुटत, ओरबाडत आहेत. महाराष्ट्र ओरबाडला जात असताना भाजपला राज्यातील सत्तेसाठी साथ दिलेले काहीच करत नाहीत असा आरोप ठाकरे यांनी केला.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर संपूर्ण भाषण केले. आपल्या माणसांवर अन्याय, आरोप होत असताना, चिखलफेक होत असतानाही त्या जराही डगमगल्या नाहीत. त्या चंद्राप्रमाणे शांत आहेत. आता घरात बसायचं नाही, आता बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. जाधव यांचे भाषण सुरु असताना रश्मी ठाकरे भावूक झाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button