प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..

तीन महिन्यांच्या बछड्यांसह वाघिणीचा ‘रॅम्प वॉक’, एकदा बघाच….

नागपूर : ममत्त्वाची सुखद अनुभूती फक्त माणसेच अनुभवतात असे नाही, किंबहुना अधिक जास्त ती प्राण्यांमध्ये दिसून येते. वाघांबाबत बोलायचे तर दोन वर्षांपर्यंत हे बछडे वाघिणीसोबतच राहतात. या कालावधीत ती त्यांना खाऊ घालण्यापासून तर शिकार करण्याचे प्रशिक्षण देते. यादरम्यान मातृत्त्वाचा सोहोळा त्यांच्यातही रंगलेला दिसून येतो. असाच एक अविस्मरणीय प्रसंग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवला. ‘एफ २’ ही वाघीण तिच्या तीन महिन्यांच्या दोन बछड्यांसह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भ्रमंती करताना दिसून आली.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य काही वर्षांपूर्वी ‘जय’ असे नामकरण झालेल्या वाघाने प्रसिद्धीस आणले होते. तो गेला आणि काही काळ या अभयारण्याची रया गेली. दरम्यानच्या काळात ‘चांदी’, ‘फेअरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणींनी पुन्हा एकदा या अभयारण्याला वलय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अभयारण्य परिसरातील गोठणगाव प्रवेशद्वार क्षेत्र हाच अधिवास असणाऱ्या ‘फेअरी’ आणि तिच्या पाच बछड्यांनी पुन्हा पर्यटकांना ओढ लावली. ते मोठे झाले आणि त्यांनी आपला नवा अधिवास शोधला. त्यानंतर हे अभयारण्य पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयातून बाहेर पडले.

अलीकडच्या वर्षभरात पर्यटकांचा मोर्चा या अभयारण्याकडे वळला आहे, कारण येथे सहजपणे होणारे व्याघ्रदर्शन. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर ‘एफ २’ या वाघिणीने तिच्या तीन महिन्यांच्या बछड्यांसह अभयारण्यात सहजपणे भ्रमंती सुरू केली आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात सफारीसाठी पर्यटकांची पहिली पसंती गोठणगाव प्रवेशद्वार आहे, कारण ‘एफ २’ वाघीण आणि तिचे बछडे. त्यामुळे ‘फेअरी’ व तिच्या पाच बछड्यांनी प्रसिद्ध केलेल्या या प्रवेशद्वाराचा वारसा आता ‘एफ २’ ही वाघीण आणि तिचे दोन बछडे पुढे चालवत आहेत. या बछड्यांच्या जन्मानंतरही ती बरेचदा बछड्यांना तोंडात घेऊन इकडून तिकडे जाताना दिसायची, पण ते क्वचितच. आता मात्र ती सहजपणे पर्यटकांना दर्शन देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button