सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. प्रवीण मुंडे मेळघाट..
आज दुपारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी त्यांची जाहीर सभा मोजरी तिवसा येथे होती. सभा संपल्यानंतर हायवेवर गर्दी झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमावा लागला. राजेश वानखडे महायुतीचे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी योगीजी आले होते. कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलिसांच्या मोठा बंदोबस्त होता. सभा संपल्यानंतर एसटी बसच्या मागच्या चाकात आल्याने संदीप देविदास चौधरी हा पोलीस कर्मचारी चांदूरबाजार येथे कार्यरत होता. आणि योगीजींच्या सभेसाठी त्याची ड्युटी दिवसा येथे लागली होती. बसच्या चाकाखाली आल्याने संदीपला जीव गमावा लागला.