माझ्यासाठी ही निवडणूक एससी एसटी ओबीसी आणि मुस्लिम समाजाला राजकीय सत्तेत भागीदार बनवण्यासाठी
अमरावती विधानसभा उमेदवार आझाद समाज पार्टी डॉक्टर अलिम पटेल..
सत्यदर्पण मेळघाट न्यूज. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. वासुदेव पात्रे
संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अमरावतीत मात्र अनेकांचे समीकरण बिघडणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे खासदार एडवोकेट चंद्रशेखर आजाद यांच्या आजाद समाज पार्टीने अमरावती शहरात मुस्लिम समाज जास्त असल्याने देश सेवा करणारे माझी लेफ्ट कमांडर डॉक्टर अलीम पटेल यांना उमेदवारी दिली आहे दहा वर्षाच्या राजकीय प्रवास लक्षात घेता ते नक्कीच बाजी मारणार मागील सहा महिन्यापासून आपल्या विधानसभेत सतत जनतेसोबत छोट्या छोट्या नुक्कड सभा आणि डोअर टू डोअर कॅम्पेनिंग द्वारे लोकांशी संवाद साधत आहे. त्यांचे म्हणणे आहे की अमरावती जिल्ह्याच्या विकास महायुती व महाआघाडीने दिलेला उमेदवार कधीच करू शकत नाही. तेच ते चेहरे मतदारांच्या समोर येत असल्याने जनमानसात नाराजीच्या सुर पाहायला मिळत आहे. अमरावती शहरात मुस्लिम मतदाता जास्त असल्याने यावेळी काँग्रेसने मुस्लिम प्रतिनिधी द्यायला हवे होते. परंतु काँग्रेस पक्षाने नेहमीच एससी एसटी आणि मुस्लिम समाजाला सत्तेपासून दूर ठेवले. परंतु आज हा समाज जागृत झालाय माझी ही निवडणूक एससी एसटी ओबीसी आणि मुस्लिम समाजाला सत्तेत भागीदार बनवण्यासाठी आहे. डॉक्टर अलीम पटेल यांची समाजात चांगलीच ओळख आहे.. आणि सलीम पटेल हे नक्की विजयी होतील. सनी चव्हाण जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी.