आदीवासी युवतीच्या पोटातुन निघाला 2 किलो 300 ग्राम वजनी गोळा
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
सत्य दर्पण मेळघाट न्यूज प्रवीण मुंडे. मेळघाट.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेल्या आणि धारणी मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोकरबर्डी गावातील निवासी एका आदिवासी युवतीच्या पोटातील गर्भाशयांमधून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तब्बल 2 किलो 300 ग्रॅम वजनी गोळा यशस्वीरित्या काढण्यात आला आहे. धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन सर्व स्तरावरून केले जात आहे.
धारणी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या माहिती नुसार भोकरबर्डी येथील रहिवासी पुष्पा भिलावेकर वय 23 वर्षे या युवतीच्या गर्भाशयामध्ये गोळा असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झाले होते. पुष्पाला तिच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून गर्भाशयामध्ये असलेल्या गोळ्याला बाहेर काढण्याकरिता नेले असता विविध रुग्णालयात नकार देण्यात आले होते. तदनंतर पुष्पाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ दयाराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत डॉ प्रदिप विश्वास, डॉ जामकर, डॉ श्रेया मोरे यांच्या चमूने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून पुष्पा भिलावेकर हिच्या गर्भाशयातून तब्बल दोन किलो तीनशे ग्रॅम वजनी गोळा काढला. या शस्त्रक्रिये करिता आरोग्य मित्र राहुल तिवारी, गौतम धोडपकर, आरोग्य मित्र सुशील तिवारी सह भूषण पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मु
मोलाचे सहकार्य केले. धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर पुष्पा भिलावेकर हिची प्रकृती सामान्य असून पुढील उपचार धारणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. सनद असो की, यापूर्वी सुद्धा धारणी उपजिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलांच्या पोटातून यशस्वीरित्या गोळे काढले आहे. खाजगी रुग्णालयात पुष्पा भिलावेकरला शस्त्रक्रिया करण्याकरिता मनाई केल्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर सर्व स्तरावरून उपजिल्हा रुग्णालय धारणी प्रशासनाचे कौतुक केले जात आहे हे विशेष.