Uncategorized
टेमरूसोंडा बोराळा पिपाधरी परिसरातील नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत.
परसापूर मोरगड नागापूर रस्त्याचे काम थंडबस्त्यात.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. चिखलदरा
मागील अनेक महिन्यांपासून परसापूर बोराळा मार्गे मोरगड नागापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम थंड बसतात असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की कंत्राट दाराने गिट्टी टाकून ठेवली व कुठे कुठे दबाई केली. दबाई केलेली गिट्टी एका आठवड्यातच ती गिट्टी पूर्ण निघून गेल्याने या रस्त्यावर गि.. गिट्टी आहे. या रस्त्यावर ये जा करणाऱ्या दोन चाकी चार चाकी यांना तारेवरची कसरत केल्याचे दिसून येत आहे या रस्त्यावर काम करणाऱ्या कंत्राटदाराला कोणाचीच भीती नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललं?????? अशी नागरिकात कुजबूज सुरू आहे. मागे पण या कामाची बातमी वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. प्राप्त माहितीनुसार या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरणार असल्याचे बोलले जात आहे.