विश्व हिंदू परिषद आणि धारणी पोलिसांनी केली कार्रवाई वंदे मातरम गौशाला यांचा सुपुर्द केले जप्त केलेल्या गाई
12 गायींना मिळाले जीवनदान, आरोपी फरार
मेलघाट प्रतिनिधी -नितिन वरखड़े
धारणी शहराजवळील विश्व हिंदू परिषदेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 12 गायी ताब्यात घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. धारणी पोलिसांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे गौ तस्करांमध्ये घबराट पसरली आहे. पीआय अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांनी 12 गायी ताब्यात घेतल्याने धारणी परिसरात खळबळ उडाली आहे. धारणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष आणि अनेक हिंदू संघटनांनी पोलिसांचे अभिनंदन केले. या सर्व जप्त केलेल्या गायी वंदे मातरम गौशाळेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. १६ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या कारवाईत विहिप चे अमोल सेंदाणे, बाबू सावलकर, लकू पटोरकर, राहिल तारेकर, प्रतीक राठोड, राजू मावस्कर, सुजल तारेकर, छोटू पवार, आदि सरागे, हरिओम फुलमाळी, सुधीर व्यास यांनी धारणी पोलिसांना साथ दिली. या सर्व गायींचे वय 6 महिने ते 10 वर्षे आहे. धारणी शहराजवळील मधवा नाल्याजवळ ही मोठी कारवाही करण्यात आली. या गायींची एकूण किंमत एक लाख 11 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ठानेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, कृष्णा जामुनकर यांनी सहभाग घेतला . याप्रकरणी तीन ते चार आरोपी मात्र ते फरार झाले.या सर्व गायींना नेण्याची शक्यता नाकारता येत नाही, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.