चुरणी येथील अजाबराव काळे विद्यालय येथील मांगे सर यांना कला शिक्षक यांना राज्य पुरस्कार मिळाला
मेळघाटातून शुभेच्छा चा होतोय वरसाव
सत्य दर्पण मेळघाट न्यूज. संपादक प्रवीण मुंडे.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे 43वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद, शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11व 12जानेवारी 2025रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र खारई सर (महाराष्ट्र राज्य कलाध्यापक मंडळ पुणे )
कार्यक्रमाचे उदघाटक -श्री. दादाजी भुसे साहेब (शिक्षणमंत्री )
विशेष अतिथी :मा. श्री. जयकुमारभाऊ रावल(राज्यशिष्टाचार मंत्री )
मा. श्री. गुलाबरावजी पाटील (पाणीपुरवठा मंत्री )
विशेष अतिथी : मा. किशोर जी दराडे (शिक्षक आमदार )
मा. श्री. गोवालजी पाडवी (खासदार नंदुरबार )
यांच्या उपस्थित श्री. विठ्ठल नामदेवराव मांगे (कलाशिक्षक)स्वातंत्रवीर श्री. अजाबराव काळे पाटील विद्यालय, चुरणी ता. चिखलदरा. जिल्हा. अमरावती. (मेळघाट )यांना कै. शंकराव बापूराव ननावरे (पुणे )यांच्या स्मरणार्थ “क्षितिज कलागौरव पुरस्कार” राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार गौरवपुर्वक प्रदान करण्यात आले आहे. श्री. मांगे सर यांचे चुरणी गावातील नागरिकांकडून व स्वातंत्र्यावीर सोसायटी कडून अभिनंदन करण्यात आले.