धारणी तालुक्यात ग्रामपंचायतीचा गलथान कारभार
भुलोरी येथील, आदिवासी महिलेची शेती हडपण्याचा प्रयत्न

सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे मेळघाट..
धारणी पंचायत समिती अंतर्गत गडगा मालूर जवळील भुलोरी, ग्रामपंचायत हद्दीत पंचायतीचा भोंगळ कारनामा गावातील महिलेने उघडकीस आणला आहे. या बाबतची माहिती आदिवासी जयस संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप तोटे ,यांच्या माध्यमातून तहसीलदार , एस डी ओ ,धारणी ठाणेदार व पंचायत समिती गटविकास अधिकारी धारणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार संदीप तोटे यांनी दिली आहे, सविस्तर माहिती अशी की भुलोरी येथील आदिवासी एका महिलेच्या वैयक्तिक नावाने तीन एकर शेती सातबारा वर असून त्या शेतीवर ही महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते , परंतु या महिलेला ग्रामपंचायत सचिव सरपंच यांनी कोणते ही माहिती न देता प्रशासकीय सचिवाने सरपंचांनी विश्वासात न घेता या महिलेच्या शेतात शासकीय पिण्याच्या पाण्याचे टाकीचे बांधकाम सुरू केल्याची तक्रार या महिलेने वरील अधिकाऱ्यांना दिली आहे .शेतीचा कोणता ही मोबदला सचिवाने दिल्या नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तालुक्यात जलजीवन , मिशन कार्यक्रमा अंतर्गत ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी मनमर्जी प्रमाणे बोगस काम करत असल्याचे संदीप तोटे यांनी सांगितले वरील महिलेला टॉर्चर करून जमीन बळकवल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या महिलेला न्याय न मिळाल्यास धारणी येथे संबंधित कार्यालया समोर उपोषणाचा इशारा या महिलेसह संदीप तोट यांनी हक्काच्या मागणी साठी उपोषण करणार असल्याचे तिने आमच्या प्रतिनिधीला सांगितले.व सदर महिलेवर अन्याय झाला असून तिला तिचे शेत परत मिळवावे असे गावकऱ्यांनी सांगितले या सर्व प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरून करावी अशी सुद्धा मागणी आदिवासी समुदायाकडून होत आहे