खिरकुड येथे घराला लागली आग आगीत दोन बकरीचा होरपळून मृत्यू
गावकऱ्यांची मागणी शासनाने मदत करावी

सत्य दर्पण मेळघाट न्यूज. प्रवीण मुंडे मेळघाट.
अकोट तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील खेरकुंड येथे घराला लागली आग आगीमध्ये घरातील सर्व सामान जडून खाक खिरकुड बु .येथील भैय्यालाल गंगाराम तादिल यांच्या घराला रात्रीच्या अंधारात एक ते दीड चा सुमारास अचानक आग लागली या आगी मध्ये घरातली शेत माल कापूस तूर गहू ज्वारी व दोन बकरीचा होरपळून मृत्यू झाला व घरातील जीवनवसतु समान जळून खाक शेत जमीन लागवड ने करून कष्ट करून व ते पीक उत्पादन काढले होते उन्हाळ्यामध्ये पुढील हंगामाकरिता पिकाचा पैसा येईल म्हणून पीक घरामध्ये साठवून ठेवले होते की कापसाला भाव नसल्यामुळे कापूस विकला नाही तुरीला भाव नसल्यामुळे तूरही साठवून ठेवली की पावसाळ्यामध्ये पुढील पिकासाठी खर्च करण्याकरिता घरामध्ये साठवून ठेवले तरी घरातील तीन ते साडेतीन लाख रुपये चे नुकसान झाले
माझ्या घराला रात्री दीड ते दोन वाजल्याच्या सुमारास आग लागली आम्हाला आग लागल्याचे काग दिसल्याने घरातील सर्व सहा ते सात लोक आम्ही बाहेर निघालो व बाहेर निघाल्यानंतर आम्ही आरडाओरड केली रात्रीचे दीड ते दोन वाजले होते गावकरी यांनी आग भिजवली विझवली या आगीमध्ये माझ्या घरातील सर्व सामान जडून खाक झाले व माझ्या दोन बकऱ्या जळून मृत्यू झाल्या शासनाने माझ्या घरातील झालेल्या नुकसानाची भरपाई मला द्यावी
भैय्यालाल गंगाराम तादिल
खिरकुड
माझ्या गावातील भाग दोन येथे रात्री दीड ते दोन च्या सुमारास आग लागल्याचे समजतात मी तिथे आज विजवण्याकरता व गावातील नागरिकांना घेऊन गेलो आग विझवली तरी आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या शासनाने आर्थिक मदत द्यावी
डीगाबर कासदे
तंटामुक्ती अध्यक्ष
खिरकुड