मेळघाट रंगोत्सव 2025 मध्ये उमेद चे स्टॉल ठरले आदिवासींचे आकर्षणाचे केंद्र
स्वयंसहाय्यता गट (SHG) महिला उत्पादने ठळक आकर्षण*

सत्य दर्पण मेळघाट न्यूज प्रवीण मुंडे.
चिखलदरा, २३ मार्च 2025 – मेळघाट रंगोत्सव 2025 या विशेष महोत्सवाच्या निमित्ताने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED Maharashtra State Rural Livelihoods Mission – SRLM), चिखलदरा अंतर्गत स्वयंसहाय्यता गटातील (SHG) महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते.
या उपक्रमाद्वारे ग्रामीण महिलांनी तयार केलेली सेंद्रिय अन्नपदार्थ, पर्यावरणपूरक वस्तू आणि स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने ग्राहकांसमोर सादर केली गेली. यामुळे महिला उद्योजकांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली तसेच स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत झाली. मेळघाट चे आमदार केवळरामजी काळे यांनी स्वयंसहायता समूहाच्या स्टॉल वरून मोहाचे लाडू खरेदी करून उपस्थित कार्यकर्त्यांना चाखण्यास दिले त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून महिला आणि उमेद च्या टीम ला शुभेच्छा दिल्या
मेळघाट रंगोत्सवाला भेट दिलेल्या नागरिकांना आणि पाहुण्यांना या उत्पादनांचे दर्शन घेण्याचीआणि चव घेण्याची संधी मिळाली तसेच त्यांनी बनवलेल्या दर्जेदार वस्तू खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED Maharashtra SRLM), चिखलदरा च्या वतीने ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. मेळघाट रंगोत्सव 2025 या उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी विस्तृत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी उमेद महाराष्ट्र SRLM, चिखलदरा ब्लॉक मिशन मॅनेजर अजिंक्य येवले क्लस्टर कोर्डिनेटर चेतन गायगोले यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले व त्यांच्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी सहकार्य केले.