मेळघाटातील विविध प्रश्नांबाबत अनुभव शिक्षा केंद्रच्या युवकांनी साधला संवाद.
विदर्भातील युवकांचा मेळघाट येथील व्हिलेज कॅम्पमध्ये सहभाग.

सत्य दर्पण मेळघाट न्यूज प्रवीण मुंडे.
अमरावती:- अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत दि.२२ ते २५ मार्च या कालावधीमध्ये मेळघाट येथील चुरणी या गावांमध्ये अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत व्हिलेज कॅम्प आयोजन करण्यात आला होते.व्हिलेज कॅम्प मध्ये विदर्भातील जिल्ह्यातून युवकांचा सहभाग होता.सर्वप्रथम अमरावती येथे सर्व युवक एकत्र येऊन मेळघाट येथे रवाना झालो.सायंकाळी ८ सुमारास आम्ही सर्व मेळघाट येथील चुरणी या गावांमध्ये पोचलो.सर्वांनी एकत्रित येऊन मसाला खिचडी तयार करून.त्याचा आस्वाद सर्वांनी एकत्र घेतला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात सर्वांनी एकत्रित येऊन आपला परिचयापासून सुरुवात केली.त्यानंतर आम्ही सर्व मेळघाटातील काही निवडीत गावांमध्ये जाऊन त्यामध्ये कामिदा,जरीदा,चुरणी या गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांसोबत अनुभव शिक्षा केंद्र च्या युवकांकडून संवाद साधण्यात आला.त्यामध्ये प्रामुख्याने तेथील संस्कृती,शिक्षण,शेती,आरोग्य,जीवनमान,अडचणी,सोय सुविधा,पाण्याचा प्रश्न,रोजगाराची कमतरता,शिक्षणाचा अभाव, बालविवाह,जीवनशैली,स्थानिक समस्या अशा विविध प्रश्नांबाबत युवकांनी मेळघाटातील नागरिकांसोबत संवाद साधून चर्चा करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी सर्व युवक एकत्रित येऊन नागरिकांसोबत झालेल्या चर्चेबाबत ग्रुप नुसार प्रेझेंटेशन करण्यात आले. व युवकांकडून या संदर्भामध्ये चर्चा घडवून आली.तिसऱ्या दिवसाची सुरुवात सर्वांनी पहाटे उठून निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये एकत्रित येऊन मेळघाट येथील जंगल सफारी करण्यात आली.या जंगल सफारीमध्ये मेळघाटातील पशुपक्षी, प्राणी,जंगल,झाडे,डोंगर यांचा किती नातं आहे.हे आम्हाला जंगल सफारीमध्ये कळलं सर्वांनी एकत्रित येऊन युवकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.त्यानंतर सर्वांनी मेळघाटातील तलावाजवळ फोटो काढण्यात आले.मेळघाटातील शेतकऱ्यांसोबत शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत तेथील पिकांबाबत व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सायंकाळच्या सुमारामध्ये मेळघाटातील गावांमध्ये युवकांशी आणि व युवतींशी चर्चा करून अनुभव शिक्षा केंद्र या प्रकल्पाबाबत माहिती दिली.चौथा दिवस यामध्ये सुरुवातीलाच व्हिलेज कॅम्पच्या निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.या निरोप संभारंभ कार्यक्रमांमध्ये अजबराव काळे पाटील कनिष्ठ महाविद्यालय चुरणी येथील प्राचार्य श्री.अरविंद घोम आणि सहशिक्षक श्री.रवीकुमार देशमुख यांचा अनुभव शिक्षा केंद्र यांच्याकडून सेवानिवृत्त निरोप समारंभ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये अजाबराव काळे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षकांचा सहभाग होता. या निरोप समारंभ कार्यक्रमांमध्ये मेळघाट येथे व्हिलेज कॅम्प करिता आलेल्या सर्व युवक व युवतीने फीडबॅक देण्यात आला.फीडबॅक मध्ये युवकांकडून मेळघाट मधील नागरिकांमध्ये नम्रता, आपुलकी,जिव्हाळा या सर्व गोष्टी दिसून आल्या.या व्हिलेज कॅम्पचे स्थानिक नियोजन नागेश दादा धोत्रे यांच्याकडून उत्तम असे नियोजन करण्यात आले होते.या व्हिलेज कॅम्पमध्ये परिश्रम सुरेश दादा लुले,आशिष धोंगडे,प्रतीक पवार, यांनी घेतले.अनुभव शिक्षा केंद्र विदर्भ स्तरीय व्हिलेज कॅम्प मेळघाट मध्ये विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील युवकांचा सहभाग होता.अशाप्रकारे मेळघाटातील चुरणी या गावांमध्ये विदर्भस्तरीय व्हिलेज कॅम्प संपन्न झाला…