
सत्य दर्पण न्यूज मेळघाट. प्रवीण मुंडे चिखलदरा.
चिखलदरा तालुक्यात दिवसेंदिवस जंगली जनावरांचे हमले वाढत चालले असून, चिखलदरा तालुक्यातील केली या गावातील तरुण विनोद छोटेलाल चिमटे वय पंचवीस वर्ष हा जांभळी येथील आठवडी बाजारात मासे विक्रीसाठी गेले असताना रात्री उशिरा दुचाकीने परत येत असताना खोगळा गावाच्या पुढे वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. व ओढून जंगलात नेले, आणि अर्धवट भक्षण केले. सकाळी ये जा करणाऱ्या लोकांना शाईन गाडीवर रक्ताच्या खुणा आढळल्या. लोकांना संशय आल्यावरून लोकांनी आजूबाजू पाहणी केली असता विनोदचा वाघाने हल्ला केलेला सव दिसला. तेव्हा लोकांनी खोगंळा येथील पोलीस पाटलांशी संपर्क केला. त्यानंतर पोलीस स्टेशन चिखलदरा येथे संपर्क करून पोलीस घटनास्थळी पोचून पंचनामा केला या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मेळघाट भाजप युवा मोर्चाचे संयोजक यशवंत केवलराम काळे व त्यांचे सहकारी ही घटनास्थळी उपस्थित होते.