Uncategorized

मेळघाटात ब्लॅक फ्रायडे दोन अपघातात सहा ठार

पोळा सणाच्या उत्सवावर पाणी.....

प्रतिनिधी –प्रवीण मुंडे

मेलघाट – शुक्रवारचा दिवस मेलघाटवासीयांसाठी काळा ठरला. पोळा सणाच्या आनंदात दोन भीषण रस्ते अपघात झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

*पहिला अपघात* – कढाव फाटेत दुपारी कढाव फाट्याजवळ स्कॉर्पिओ (एमपी 09 झेडडी 0028) व मोटरसायकल (एमपी 68 एमजे 1061) यांची जोरदार धडक झाली. या अपघातात धारनमहू येथील मुकेश राजकुमार भिलावेकर (22) व चिमुरडी अनुष्का सोमा धांडे (6) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी कीर्ती रामचंद्र ठाकरे (18) हिने उपचारादरम्यान प्राण सोडले.

*दुसरा अपघात* – साद्राबाडी
रात्री उशिरा धारणीपासून सुमारे 14 कि.मी. अंतरावर साद्राबाडी येथे दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघा तरुणांचा – रूपेश नारायण मावसकर (20), रवी मंगल जावरकर (18) व राजेश अनिल पटोरकर (23) – मृत्यू झाला.

*क्षेत्रात हळहळ* –
एका दिवसात घडलेल्या या दोन अपघातांमुळे संपूर्ण मेलघाटात शोककळा पसरली आहे. पोळा सणाचे वातावरण शोकाकुल झाले असून पोलिसांनी अपघातांची चौकशी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button