मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दो सगे भाई.
डॉक्टर मोहन यादव मुख्यमंत्री मध्य प्रदेश यांचे वक्तव्य.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज…. मेळघाट प्रवीण मुंडे.. सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळघाट विधानसभा 41 येथे केवलराम काळे यांच्या प्रचारार्थ आलेले मध्यप्रदेशचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर मोहन जी यादव त्यांनी सांगितले महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोघे सख्खे भाऊ आहेत. महाराष्ट्रातील हवा मध्य प्रदेशात जाते आणि मध्य प्रदेशातली हवा महाराष्ट्रात येते. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास ते बोलत होते आणि त्यांनी असे शब्द मेळघाटातील जनतेसाठी बोलले एका दिवसात महत्त्वाच्या बदल घडवण्यात आला लाडकी बहीण योजना. नमो शेतकरी सन्मान निधी. पुढचे पाच वर्ष वीज मोफत. हा भारतीय जनता पक्षाच्या घोषणापत्र सांगितला. व जनतेने खूप प्रतिसाद दिला. वातावरण असे तापले होते चूरणी गावातील. काँग्रेस व प्रहार या पक्षांना जनता मोहन यादव यांच्या कार्यक्रमात सापडली. तिथेच ते प्रचार करू लागले. डॉक्टर मोहन यादव मुख्यमंत्री मध्य प्रदेश यांची सभा संपताच काँग्रेस पक्षाने बाईक रॅली काढली. व प्रहार पक्षाचा डीजे वाजू लागला. कार्यक्रम भाजप पक्षाचा. अशी माहिती आज मेळघाटातील घडामोडीवर राहिली.