मेळघाट चे सोनू बेठेकर ची तिहेरी सुवर्ण पदकाची मानकरी.
४५वी महाराष्ट्र राज्य चैंपियनशिप २०२४ मध्ये सोनू बेठेकर ची ऐतिहासिक विजय.
सत्य दर्पण मेळघाट न्यूज प्रवीण मुंडे. मेळघाट.
मेळघाट चे सोनू बेठेकर ची तिहेरी सुवर्ण पदकाची मानकरी ४५वी महाराष्ट्र राज्य चैंपियनशिप २०२४ नागपूर दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या युनिव्हर्सिटी स्टेडियम रवि नगर सिंथेटिक मैदानात मास्टर्स गेम्स मध्ये सहभागी होऊन श्री. सोनू बेठेकर (आंतरराष्ट्रीय खेळाडू) यांनी उत्कृष्ट कामगिरी करून तिन्ही गटामध्ये अनुक्रमे ५ किमी जलद गतीने चालणे, ११० मीटर अडथळा, ४०० मीटर अडथळयात सुवर्ण पदक प्राप्त करून मेळघाट चा आणि अतिदुर्गम भाग असलेल्या ,ज्या गावात अजुन पर्यंत रस्ते नाही,विज नाही,चांगले आरोग्य व शिक्षण नाही ,आजपर्यंत त्या गावामध्ये सरकारी,किंवा खाजगी बस जात नाही ,,घनडाट जंगलाच्या आत मध्ये वसलेला ,जिथे कोणत्याही प्रकराची मुलभुत सुविधा नाही अश्या छोटासा गाव रायपूर या गावाची राज्यभरामध्ये नाव चमकवल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांच्या वर्षा होत आहे.
तसेच मागील दहा वर्षापासून निःशुल्क सेवा व्हॉलिबॉल प्रशिक्षण आणि एथलेटिक्स ची प्रशिक्षण सुध्दा देतात. त्यांनी आतापर्यंत ४५ च्या जवळ पास मेडल्स ची कमाई करून वेगवेगळ्या देशात भारताची प्रतिनिधीत्व करून वर्चस्व गाजवले.
त्यांचा नविन विद्यार्थाना व मेलघाटातील युवा पीढ़ीना संदेश दिला आहे परिस्थिचा नावावर रड़ने बंद करा,मी पन एक साधारण परिवारातून जन्म घेतला आहे,माझी पन परिस्थिती खुप हालाकीची होती ,स्वता मेहनत करा ,जिद्द ठेवा यश नक्की भेटेल व सोबत अजुन आरोग्याबाबत एक संदेश दिला दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा दररोज मैदानात सकाळी १ तास स्वताच्या शरीराला वेळ दिले तर नक्की ७०% रोग असाच बरं होण्यास मदत होईल. आपल्या आवडीनुसार कोणत्याही खेळ करा. आणी सकाळी पहाटे आणि सायंकाळी व्हॉलिबॉल मैदानात मुलांसोबत खेळा, याच्यामुळे दिवस भरात कामाचा थकवा, ताण तणाव नाहीशा होते. पूर्ण सकारात्मक विचार निर्माण करते. बुध्दीला चालना मिळते.म्हणून दिवस भरात एक तास तरी मैदानी खेळाकड़े लक्ष द्यावे,जेणेकरून कोणताही आजार होणार नाही ,अश्या महत्वपूर्ण संदेश सोनू यांनी आमच्या चैनल चा माध्यमातून जनतेला,युवा वर्गांना दिला .