प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घातले देवाला साकडे..

सत्य दर्पण मेळघाट न्यूज.. संपादक प्रवीण मुंडे..
आज शनिवार रोजी दुपारी बाराच्या सुमारास यज्ञ् हवन करून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. महा शिव आरती करण्यात आली युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी देवाकडे मागणी केली की महायुती अमरावती आठ पैकी सात जागी विजयी झाले असून याचे सर्व श्रेय नवनीत राणा व डॉक्टर अनिल बोंडे व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे असून आज शनिवार रोजी काटकुम्भ चूरनी हात्रू येथील युवा स्वाभिमांचे कार्यकर्ते यांनी आज प्राचीन शिवमंदिर भेसदेही येथील शिवलिंग चे दर्शन घेऊन देवाला साकडे घातले यात युवा स्वाभिमान चे कार्यकर्ते. हरी ओम बेलकर, सुनील बिसनदरे, सतीश हरसुले, सुनील बिलवे, सोनू मालवीय, नागेश मुंडे, राहुल आठवले राहुल गाठे, आयुष मालवीय नंदा बचले, मुकेश अथोटे. व दहेंद्री येथील माजी सरपंच श्यामराव जामुनकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button