महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारीसाठी रस्सीखेच
सत्यदर्पण मेळघाट न्यूज.. प्रवीण मुंडे.. चिखलदरा
सध्या विधानसभेचे वारे वाहत असताना उमेदवारीसाठी अनेक उमेदवार अमरावती जिल्ह्यात आपलीच उमेदवारी पक्की मानत आहे. सर्वात जास्त चुरशीची लढत मेळघाटात दिसून येत आहे. सोशल मीडियावर माजी आमदार केवल रामजी काळे यांची उमेदवारी चे बॅनर सोशल मीडियावर झळकत आहे पण ही बातमी फेक असून केवळ रामजी काळे नवनीत ताई रानांचे जवळचे समजले जातात. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार केवळ राम काळे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच समजले जात होते महायुतीची उमेदवारी नवनीत राणा मुळे केवळ राम काळे यांची पक्की मानली जात होती. पण सध्या प्रहार सोडून शिवसेनेत सामील झालेले आमदार राजकुमार जी पटेल हे सध्या मुंबईत ठाण मांडून आहे . आता सर्वांचे लक्ष लागून आहे कि मेळघाटाची सीट कोणाकडे जाते. इकडे महाविकास आघाडीचेही इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त झाल्याने कुणाची वर्णी लागेल हे सांगता येत नाही.